ताजमहालाला उद्देशून एक शेर आहे तो आठवला,
गर फिरदौस फी जमिन अस्त,
हमिन अस्त, हमिन अस्त, हमिन अस्त.
(माझी कांही चूक होण्याची शक्यता आहे, जाणकारांनी दुरूस्त करावे)
या शेराचा अर्थः
जमिनीवर जर कुठे स्वर्ग असेल,
तर तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे.
आस्तिक आणि नास्तिक हे शब्दही त्यातुनच आलेले जाणवतात.
हे असं असतं (अस्तं) आणि असं असं नसतं (न+अस्तं) असे जे आपण म्हणतो तेही मूळात, कंसातील शब्दांप्रमाणे असावे असे वाटते.
समस्त, वादग्रस्त, तथास्तु वगैरे 'स्त'कारान्त शब्दही 'अस्त' जोडूनच झालेली आहेत का? (एक प्रश्न)