आपला मांजा तयार झाला की इतरांच्या मांज्यापुढे तो कितपत टिकाव धरेल हे पाहण्यासाठी एक गुणवत्ता चाचणी घेतली जाते.
आपला मांजा दोन मुठींमध्ये ताणून धरायचा. दुसऱ्यालाही तसे त्याच्या मांज्याचे करायला सांगायचे. आणि आपल्या मांज्याने त्याच्या मांज्याला काटकोनात धडक देता देता किंचित घासल्यासारखे करायचे. जो मांजा तुटेल तो कमकुवत.
वरील चाचणीला लग्गा म्हटल्याचे आठवते. (हा एक प्रकारचा पेचच आहे असे वाटते.)
शिवाय वरील पद्धत 'पुरषी' समजली जाते. निदान तिचे नाव पुरषी लग्गा असे असल्याचे आठवते.
बायकी लग्गा म्हणजे दुसऱ्याला त्याचा मांजा वरीलप्रमाणे धरायला सांगायचे आणि आपला मांजा त्याच्या एका बाजूने नेऊन त्याच्या मांज्यापलीकडून दुसऱ्या बाजूने बाहेर काढून दुसऱ्या मुठीत पकडायचा. असे झाले की दोघांनी आपली मांजे मुठींनी पुढे मागे ओढायचे (पूर्वीच्या काळी रवीला दोरी बांधून घुसळत असत तसे! ) ह्या पद्धतीला बायकी लग्गा असे नाव असल्याचे आठवते.
चू. भू. द्या. घ्या