माझ्या वरील प्रतिसादात लग्गा हे पतंग पकडायचे साधन येऊन गेले आहे. ... लांब काठी, टोकाला काटेरी फांदी, ज्यात 'गुल' झालेल्या पतंगाचा मांजा अडकतो.
'लग्गा लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ या लग्ग्यावरून आलेला दिसतो.
कापलेला पतंग पकडताना, अनेक 'सामान्य' लोक आपल्या हाताचा उपयोग करतात. तर काही 'पोचलेले' लोक हातातील लग्ग्याचा (जो १०-१२ फूट लांब सहज असतो) उपयोग करून सामान्यांवर कुरघोडी करतात. अनेकांकडे लग्गे असतिल तर ज्याचा लग्गा लांब त्याला पतंग मिळतो.
व्यवहारातही ज्याच्याकडे इतरांपेक्षा अधिक चांगली ओळख असेल, त्याचे काम होते... लग्गा लागतो.