ही गझल आधी ऐकली असली तरी आपल्या लेखामुळे बारकावे समजले. खाली दोन दुवे आहेत. पहिल्यामध्ये दोन गाणी आहेत. पहिले गाणे लताने गायले आहे. चाल बहुतेक हृदयनाथची आहे. हे तितकेसे आवडले नाही. मराठी सुगम संगीताचा बाज उर्दू गझलेला शोभत नाही असे माझे मत आहे.
त्याच दुव्यातले दुसरे गाणे आशाने गायले आहे. चाल जयदेवची आहे. अरेबिक ढंगाची चाल, रबाबचा वापर गालिबच्या गझलेशी सुसंगत वाटतो. दुसऱ्या दुव्यात आशा हेच गाणे लाईव म्हणते.
विनायक