आमची मुलं लहान असतानाची गोष्ट. आम्ही जेवायला बसलो होतो. माझा धाकटा मुलगा माझ्या बाजूला बसला होता. तो स्वतःच्या हातानी जेवत होता. पण त्याला ते नीट जमत नव्हतं. घास तोंडापर्यंत नेईपर्यंत त्यातला अर्ध्याच्या वर परत ताटात पडत होता. त्याची त्रेधा उडत होती. ते पाहून मी त्याला म्हणालो, "मी भरवू का? " त्यावर तो उत्तरला, "नको. मी भरतो".