या विषयाचे अनेक पैहयू आहेत.
१. हे मात्र खरे आहे की आपल्या दिवसाची सुरुवात आजकाल तुम्ही वर दिली आहे तशीच होते. त्याला काहीच हरकत नाही. पण जेव्हा आपण एखादं काम करायला घेतो तेव्हा फक्त आणि फक्त तेच काम करण्यासाठी आपण आपलं १०० टक्के लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित करतो का? जर तसं असेल तर मग अशा विरंगुल्यसाठी थोडा वेळ देण्यामध्ये काहीच वावगं नाही अस मला वाटत आहे. कारण जर आपण पूर्णं पणे लक्ष केंद्रित करून एखादी गोष्ट करत आहोत मग आपलं ते काम नक्कीच लवकर, चांगलं होईल आणि आपल्याला काम चांगलं छाल्याच समाधान पण वाटेल, पण बऱ्याचदा अस अनुभववायला येत की आपण जे करत असतो त्यात आपण १०० टक्के समरस झालेलो नसतो, घरी असलो की ऑफिसं चे विचार, आणि ऑफिसं मध्ये असलो की घरचे.
२. आपले ऑफिसची वेळ इतकी जस्त असते, की दिवस भर म्हणजे ९ तास एखादा माणूस इतक्या वेळ लक्ष केंद्रित करूच शकणार नाही हे ऑफिसच्या व्यवस्थापनाने गृहीत धरलेले असून त्यातले ६ तासच प्रोडक्टिव असतील आणि ३ तास विरंगुल्यसाठी हे गृहीत धरलेले असेल कदाचित.