प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कवितेत जेव्हा आपण मी, आई, बाप, बायको, मित्र वगैरे पात्र वापरतो तेव्हा त्याचे स्वरूप प्रातिनिधीकच असते.
या कवितेत सुद्धा ग्रामीण महिलेचे आणि संस्कृतीचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे.
हे वर्णन अन्य कोणत्याच पात्राला नायक बनऊन मला ती व्यक्तीरेखा साकारता येईना.
ग्रामीण स्त्री म्हणून जरी हे पात्र साकारायचा मी प्रयत्न केला असता तर त्यावर इतरांकडून आक्षेप आला असता. 
शिवाय हेच रूपडे तेवढे चांगले आणि बाकी रूपे वाईट आहे काय? वगैरे वगैरे तऱ्हेची मला विचारणा झाली असती,
आणि महत्त्वाचे म्हणजे मला उत्तरे देणे कठीण झाले असते.
म्हणून मी या कवितेत ती व्यक्तीरेखा "बायको" या रुपात साकार केली.
आणि सलवार, नववारी, टीकली, कुंकू एवढे संदर्भ सोडलेत तर ही व्यक्तीरेखा माझ्याही 'बायकोशी' बऱ्यापैकी मिळती जुळती आहे.