मी आता जे लिहीतोयं त्याचा विपश्यनेशी फक्त वरवरचा संबंध आहे, तुम्ही त्याची विपश्यनेशी जोडणी करू नका कारण मग त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही.
अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचारांना सक्रिय ठेवायला श्वासातल्या प्राणवायुची गरज आहे, हा प्राणवायू जर तुम्ही सर्वस्वी शरीराकडेच नेलात तर विचार प्रक्रिया थांबते. तुम्ही केव्हाही फक्त लक्षपूर्वक श्वास घ्या आणि सोडा, हा फक्त सवयीचा भाग आहे, एकदा जमलं की जमलं!
यात तीन घटना घडतात : एक तुमचं लक्ष विचारांकडून श्वासाकडे जातं, दोन श्वास विचारांकडे न खेचला जाता शरीराला मिळायला लागतो आणि तीन तुमची विचारांची प्रक्रिया थांबून तुम्हाला सॉलिड उत्साह वाटायला लागतो!
करून बघा आणि इथे कळवा.
संजय