मी फक्त विनोदी लेखन वाचतो आणि विनोदी सिनेमे पाहतो. मी पेपर देखील वाचत नाही की टिव्ही पाहत नाही. थोडक्यात म्हणजे मी कोणतीही माहिती जमा करत नाही.
मी जे लिहीतो ते मला शून्याचा बोध झाल्यामुळे सुचतं, त्यातले संदर्भ माझ्या पूर्वीच्या वाचनातून येतात पण माझं लेखन हा माझा अनुभव असतो आणि तो मला कुणाशी तरी शेअर करावासा वाटतो म्हणून मी लिहीतो. मी लिहीतांना मला काही आठवावं लागत नाही, मी फक्त मजा येतेयं की नाही एवढच बघतो, आणि मला मजा आली की वाचणाऱ्याला मजा येते असा साधा हिशेब आहे.
आता हा लेख मला गंगाधरसुतांच्या कथेवर त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे लिहावासा वाटला. मी मृत्यू या विषयावर आणखी अनेक प्रकारे लिहू शकतो. या पूर्वी देखील मृत्यूवर मी 'या निशा सर्व भूतानां' मध्ये लिहीलंय. कधी सुचलं तर मी मृत्यूवर विनोदी अंगानी देखील लिहीन.
संजय