वा वा! फारच नामी माहिती दिलीत्. हा शब्दकोश मला नवखाच. धन्यवाद.

          मी लहानपणी आजोळी (इंदापूर, जि. पुणे) गेलो की, बहुधा मे महिन्याच्या सुट्टीत, मामा माळावर (गांवाबाहेरील माळरानावर) घेऊन जात असे. तिथे वावडी उडवण्याचा खेळ चाले. ही वावडी घरीच करावी लागे. चौकोनी आकाराची वावडी चांगली प्रशस्त असे. उभ्या आयताप्रमाणे तिची रचना बांबूच्या कामट्या, खाकी कागद आणि खळ यांपासून ती बनवली जाई. उडवण्यासाठी सुतळीचा वापर केला जाई. या वावडीला खूप लांब शेपटी खालील दोन टोकांना लावलेली असे. वरच्या वाऱ्याला वावडी लागली, तर लहान मुलांना ती ओढून नेई.