शेखर,
लेख आवडला. पण -
१. सदाशिवरावभाऊ यांनी उद्गीरच्या लढाईत निजामाचा पराभव केला होता. ते शिस्तप्रेमी आणि मुत्सद्दी होते. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा 'पेशव्यांचे दिवाण असलेल्या' हा उल्लेख खटकला.
२. युद्धापूर्वीच अब्दाली शरण येणार होता. (खरं तर हाच उद्देश भाऊंचा होता. ) पण शरण आलेल्या अब्दालीला त्यांनी इस्तंबूलपर्यंतचा कर मागितला आणि बोलणी फिस्कटली.
मराठी/भारतीय झेंडे हिमालयापार - नव्हे युरोपाच्या द्वारापर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षा दुर्दैवानं अयशस्वी ठरली.
- कुमार