कुमार,
आपण मांडलेले मुद्दे योग्यच आहेत.
परंतु,
१] सदाशिवरावांचे मुख्य पद नमूद करणे, एवढाच माझा हेतू होता. त्यांच्या पराक्रमाबद्दल कोणतंही दुमत नाहीच. प्रत्यक्ष युद्धातही ते इतक्या आवेशात होते की, इतिहासकार म्हणतात, त्यांनी अंबारीतून थेट घोड्यावर झेप घेतली आणि शब्दशः कत्तल करत ते शत्रूवर तुटून पडले.
२] अब्दाली युद्धापूर्वी शरण नव्हे; तर तहाची बोलणी करण्यास उत्सुक होता. पेशव्यांच्या पराक्रमाबरोबरच त्याला आपले सैन्य इथे घेऊन येण्यात, युद्धास लावण्यात फार स्वारस्य त्याला नव्हते. पण ती तहाची बोलणी फिसकवण्यात नजीब्याचाही मोठा हात आहे.
अब्दालीचा अभास केल्यास असं लक्ष्यात येतं की, तो अतिशय धुरंधर आणि हिशेबी होता. या युद्धात, युद्धापूर्वी, त्याला कोणताही फायदा दिसत नव्हता. मुळात, काही महीने नजीबखानाने कित्येक खलिते धाडल्यानंतर तो हिंदुस्थानात आला होता. त्यामुळे तह करण्याच्या त्याच्या भूमिकेमध्ये अनास्था अधिक होती; पण भीतीचा लवलेश नव्हता.
असो...
आपण नमूद केलेले मुद्दे खोदून काढण्याचा माझा कोणताही हेतू नाही. पण इतिहासाबद्दल सद्ध्या समाजात असलेला अति-नकारात्मक दृष्टिकोण संदर्भासहीत मुद्दे लिहिण्यास भाग पाडतो. पानिपताचा इतिहास पराभवाचा असला तरी तो पराक्रमाचा आहे, राष्ट्रभक्तिचा आहे, निष्ठेचा आहे; तसाच तो तकलादू नियोजनाचा आहे, गमावलेल्या आत्मविश्वासाचा आहे आणि पुढे येऊ घातलेल्या भयाण पारतंत्र्याचा आहे.
पर्यायाने, महत्त्वाकांक्षा आणि कृती यांच्यामध्ये असलेल्या विरोधाभासाचाही आहे.
पुन्हा एकदा मान्य करतो, की आपले मुद्दे योग्य आहेतच. परंतु, इतिहासाच्या साक्षीने ते नमूद करण्याचा माझा प्रयत्न होता. गैरसमज करून घेऊ नये.
चु. भू. द्या. घ्या.