पहीला मुद्दा:

कविता हा अत्यंत गुंतागुंतीचा साहित्य प्रकार आहे. कविता निर्मिती हा कविसाठी भावनेचा परमोच्च क्षण असू शकतो. चांगली कविता आणी वाईट कविता यामधिल सीमारेशा फारच धुरकट आहे. आणि सापेक्ष देखिल!! एखाद्याला आवडलेली कविता दुसर्याला भिकार वाटू शकते.

दुसरा मुद्दाः

>>ना त्याला काही अर्थ, ना यमक- वृत्ताचं कोंदण, ना प्रवाही शब्द शैलीचा साज

यमक आणि वृत्त हा कविता सादरीकरणाच्या अनेक प्रकारापैकी आहेत. छान यमक जुळलेल्या सगळ्या कविता चांगल्या असतात कां? अर्थहीन शब्दांची मालीका वृत्ताचे गणित सांभाळून सादर केली तर तिला चांगली कविता म्हणता येईल कां?

तिसरा मुद्दाः

अनुल्लेखापेक्षा सदर कवितेमध्ये तुम्हाला काय रुचले नाही किंवा काय चुकीचे वाटते ते कविला लिहून कळ्वावे, ज्या योगे कवीला त्या कवितेमागील आपली भुमिका स्पष्ट करावयास संधि मिळेल. कदाचित त्या मधून नवे विचार समोर येतील.

अर्थात, हि सगळी माझी वैयक्तिक मते झाली.

--परीकथेतील राजा