याबाबत असं सांगावसं वाटतं की एकूणच ललित लेखन हा प्रकार वाचायला सोपा नि लिहायला अत्यंत अवघड आहे.

आपल्या लिखाणावर प्रतिसाद आले की लेखकाला बरं वाटतं. पण प्रतिसादांची संख्या "धन्यवाद" सारखे प्रतिसाद देऊन लेखक स्वतःच फुगवू शकतो व त्या फुगवलेल्या प्रतिसाद संख्येमुळे लेखक आत्मसंतुष्ट होण्याची शक्यता असते. लेखनाचा दर्जा सुधारावा असं वाटत असेल तर दोन गोष्टी कराव्यात. एक म्हणजे प्रतिसादांच्या संख्येत लेखकाचे प्रतिसाद समाविष्ट करू नयेत. नि दुसरं म्हणजे वाचनसंख्या दाखवण्याची व्यवस्था असायला हवी.