भ्रष्टाचाराची अनेक नावे आहेत. आपण एका  नवीन नावाचा उल्लेख केला आहे. भ्रष्टाचार समूळ नष्ट करणं
आता आणि यापुढेही शक्य नाही. कोणी कितीही म्हंटलं तरी . ही एक मूळची वृत्ती असावी. देवाला प्रसन्न करून घेण्यापासून ते प्रत्यक्ष
लाच देण्यापर्यंत सगळीकडे भ्रष्टाचाराचीच रुपं दिसतात. जोपर्यंत खोट्या गोष्टी करण्याची लहान पणा पासून लागलेली सवय जात नाही
तो पर्यंत भ्रष्टाचार चालूच राहणार . समजावून सांगून यात काही बदल होईल असं वाटत नाही. तरी आपण या विषयावर हिरिरीने चर्चा
करतो व मतं मांडतो. माणसाला त्याच्या अस्तित्व नष्ट होण्याची भीती  वाटत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार.  असं वाटतं. अशा प्रकारची
भीती निर्माण करायला हवी . जिवाच्या भीतीने हे थांबलं तर थांबू शकेल. निदान त्याच्यावर ताबा तरी येईल, असं वाटतं. आपल्याला
हे पटेल की नाही माहित नाही.  पु. ले. शु.