१. धर्म या नामाला इक प्रत्यय लागून धार्मिक हे विशेषण तयार होते. प्रत्यय लागताना धचा धा होतो. तसेच मर्म पासून मार्मिक.
२. प्र+ईक्ष=प्रेक्ष या धातूला क प्रत्यय लागून प्रेक्षक हे नाम तयार होते.
३. पर्यावरण या नामाला ईय प्रत्यय लागून पर्यावरणीय हे विशेषण तयार होईल.
४. संनिध या विशेषणाला य प्रत्यय लागून त्याच्यापासून सान्निध्य हे भाववाचक नाम तयार होते. तसेच प्रमाणपासून प्रामाण्य. य लागताना सं चे सां आणि प्र चे प्रा झाले.
या इक, क, ईय, आणि य या चारही प्रत्ययांचा जज्वल-जाज्वलशी संबंध नाही.
जज्वल/जाज्वल हे विशेषण नाही की नाम नाही. जज्वल हे ज्वल धातूचे दुसऱ्या भूतकाळाचे रूप आहे, म्हणजे क्रियापद आहे.
ज्वल्(जळणे)पासून जाज्वल्(जोरजोरात जळणे) हा आधिक्यदर्शक धातू बनतो. या धातूचे वर्तमानकाळी धातुसाधित विशेषण म्हणजे जाज्ज्वल्यमान. अर्थ : जोरजोरात जळणारा. (यातला मान प्रत्यय हा बुद्धिमानमधला मान नाही! बुद्धिमान् हे बुद्धिमत् या शब्दाचे प्रथमेचे एकवचन आहे. बुद्धिमान् बुद्धिमन्तौ बुद्धिमन्तः। जाज्वल्यमानमधला मान हा वर्तमान, क्रियमाण मध्ये आहे तसला मान आहे). या संस्कृत जाज्वल्यमानपासून मराठीत जाज्वल्य हे विशेषण आले. संस्कृतमध्ये जाज्वल्य हा शब्द नाही! या संस्कृत जाज्वल्यमानपासून मराठीत जाज्वल्य हे विशेषण आले. संस्कृतमध्ये जाज्वल्य हा शब्द नाही!
मला वाटते, या स्प्ष्टीकरणानंतर जाज्वल्यसंबंधी सर्व शंका दूर व्हाव्यात.--अद्वैतुल्लाखान