धर्मवीर भारतींच्या 'गुनाहोंका देवता' ह्या कादंबरीवरून 'एक था चंदर, एक थी सुधा' ह्या नावाचा एक चित्रपट अमिताभ बच्चन आणि जया भादुरीला घेऊन बनत होता पण पूर्ण झाला नाही. कादंबरी वाचली तेव्हा ह्यावर चित्रपट काढला तर चंदर आणि सुधा यांच्या भूमिकासाठी अमिताभ आणि जया एकदम 'फिट्ट' आहेत असं वाटलं होतं. असा चित्रपट बनतोय हे कळल्यावर फारच छान वाटलं पण तो घडलाच नाही. हा हंत हंत!!