ल्यायली नयनात जी, फक्त काळी रात्र होती,
आंधळी अन घुसमटती, सय तुझी रे मात्र होती,
मज पिसारे का मिळाले, कापलेले मोर जेव्हा,
माझिया उरात तेव्हा, एकटी लांडोर होती..