खूपं छान लिहिला आहे तुम्ही लेख त्यांबद्दल धन्यवाद.
यावरून आमच्या कुत्र्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. मला किती लिहू आणि कुठून सुरुवात करू असं झालं आहे.
जॉकी(कुत्रा) १ महिन्याचा होता तेव्हाची गोष्ट - त्याला घरात बांधून आम्ही सगळे घरातील मंडळी सिनेमाला गेलो होतो. जॉकीला जिथे बांधलं होत तिथून म्हणजेच त्याच्या साखळीच्या परिघामध्ये जवळ पास काही नव्हत. फक्त सोफ्याच्या थोडा भाग होता. सोफ्यावर माझं दप्त्अर होत. आम्ही सिनेमाहून परत येई पर्यंत त्याने माझ्या दप्तरामध्यल्या एकानं एक वही पुस्तकाच्या पार चिंध्या करून ठेवल्या होत्या.
आमच्या घरात जॉकी कोणाला घाबरत असेल तर ती व्यक्ती म्हणजे माझी आई. जॉकी आमच्या हत्रुणात येऊन झोपू नये म्हणून आई रात्री त्याला वरंड्यात बांधायची. त्याला बेडरूम मधून बाहेर काढण्यासाठी आई जेव्हा म्हणायची की जॉकी बाहेर हो, तर ते त्याला समजत नसे, पण जॉकी हो बाहेर म्हटलं की मात्र तो लगेच बाहेर जायचा.
असो. रात्रभर लिहितं राहिले तरी या गमती-जमती संपणार नाही, त्यामुळे इथेच थांबते.