"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
एखादा चित्रपट महोत्सव झाला आणि त्याबद्दल पेपरात वाचलं की मग मी मनाशी एक कुठलीही भाषा धरतो आणि त्या भाषेतल्या सिनेमांबद्दल नेटवर माहिती शोधतो. मग त्यातून अनेकदा हाताला रत्नं लागतात. वेगवेगळ्या देशांतल्या वेगवेगळ्या संस्कृतींची निदान एक तोंडओळख होते. आणि माणूस ह्या प्राण्याची सुखदुःख वरकरणी कितीही वेगवेगळी वाटली तरी एका समान वैश्विक धाग्यानं एकमेकांत गुंफली गेल्याचं सत्य वारंवार मनात गडद होत जातं. सापडलेला/ले सिनेमे मिळवून बघणं म्हणजे खरी गंमत. तो मिळून पाहेस्तोवर त्याबद्दल जास्त वाचणं टाळायचं वगैरे, एकदम माहौल बनवायचा. पण सिनेमा ...