अनु,
जगात दुःख आहेत, म्हणून सुखाला 'चव' आहे. अशा अनेक अप्पा-काकूंच्या आप्त स्वकियांनी, त्यांना त्यांच्या उतारवयात, आपला शक्य तितका सहवास उपलब्ध करून द्यावा. म्हातारपणी जगण्यासाठी, औषधपाण्यासाठी पैशांची गरज तर भासतेच पण मृत्यूची चाहूल लागलेल्या या जीवांना 'आपली' माणसं सतत जवळ हवी असतात. त्या 'आपल्या' माणसांचे मायेचे दोन शब्द, ढासळणाऱ्या मनाच्या इमारतीची, ठीकठीकाणी डागडूजी करीत असतात. पडक्या इमारतीचा प्रत्येक 'टेकू' जितका मोलाचा तितकेच हे मायेचे शब्द वृद्धांना महत्त्वाचे असतात.
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
श्री. अजित साठे,
कथा लिहावयास घेतली तेंव्हा त्याची दिशा निश्चित नव्हती. उलट, सुरुवातीचे परिच्छेद लिहील्या नंतर २-३ दिवस मनाची पाटी कोरीच राहीली. त्यानंतर मात्र, तिन्ही भाग पूर्ण होईपर्यंत, त्या पाटीवर शब्द उमटत राहीले आणि मी त्यांना 'मनोगता'वर उतरवत राहीलो.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.