आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
ज्युरी सिस्टिमचा चित्रपटातला वापर पाहिला रे पाहिला की, १९५७ चा `ट्वेल्व्ह अँग्री मेन` आठवायलाच हवा. मुळात रेजिनाल्ड रोजच्या टेलीप्लेवर आधारित असलेला हा चित्रपट. हा रुढार्थाने चित्रपट माध्यमाबरोबर निगडित मानल्या गेलेल्या दृश्यात्मकतेचा मर्यादित; पण अचूक वापर करणारा होता. जवळजवळ पूर्ण चित्रपट घडतो तो एकाच खोलीत. ज्युरी रूममध्ये इथे बारा ज्युरर्स एका तरूणाच्या भविष्याचा निवाडा करताहेत. त्याच्यावर आरोप आहे, तो आपल्या वडिलांच्या खुनाचा. प्रेक्षकांना मूळ घटना दाखविली जात नाही, ना त्याला खटल्यातल्या वकिलांच्या युक्तिवादाचा भाग सुनावला जात. ...
पुढे वाचा. : विकतचा न्याय आणि `रनअवे ज्युरी`