श्री. चित्त यांनी सुचविलेल्या डझनभर सुधारणा विचार करण्या योग्य आहेत.
माझ्या काही सुचवण्या -

१. महाराष्ट्रातील प्रमुख गावांचे तापमान, हवामान यांची नोंद असावी, वैयक्तीकरण असावे.
आणि 'मनोगता'चेही  'तापमान' दर्शक असावे.

२. पहिल्या पानावर बातम्यांचे सार असावे.
जागा खूप लागेल. आणि बहुतेक मराठी वर्तमानपत्रे 'नेट' वर उपलब्ध असताना याची खरोखर गरज आहे?

३. पहिल्या पानावर आजचा सुविचार, आजचा शब्द असावा.
तो सर्वांनी आचरणात आणणे बंधन कारक असावे.

४. प्रशासकीय मंडळाबाबत पारदर्शकता असावी. किमान त्यांची नावे उघड असावीत.
सूचना स्वागतार्ह आहे. परंतु जो पर्यंत मनोगत 'व्यक्तीगत मालमत्ता' आहे तो पर्यंत आग्रह धरता येत नाही.

६. मनोगतावर प्रकाशनासाठी खुला आणि निवडक असे दोन गट असावेत.

७. निवडक साहित्याचा गटात मजकुराची निवड करण्यासाठी ते खुल्या गटात प्रकाशित करता येणार नाही, अशी तरतूद असावी. आणि निवडक साहित्याच्या गटासाठी संपादकीय विभाग सुरू करण्यात यावा.
कलम ६ आणि ७ नीट कळले नाही. अजून जरा तपशील उपलब्ध झाला तर बरं होईल.

८. मनोगताने महिन्याकाठी विशेष पुरवण्या काढाव्यात.
उद्देश आणि विषयांची व्याप्ती काय असावी?

९. संपादकीय आणि प्रशासकीय धोरण स्पष्ट करण्यात यावे. संपादकीय आणि प्रशासकीय मंडळावर वेगवेगळ्या विचारसरणीच्या मनोगतींचे प्रतिनिधित्व असावे. निष्पक्षता केवळ असू नये ती दिसावीही.
कलम ४ पाहा.

१०. मनोगतावरील निवडक साहित्याचे, लेखांचे, कृतींचे संकलन करून एक वार्षिकांक प्रकाशित करण्यात यावा. ह्या वार्षिकांकासाठीच्या साहित्याची निवड गैरमनोगतींकडून व्हावी.
खर्चाचे काय?

११. मराठीतल्या जुन्या, दर्जेदार ग्रंथाचे, वाङ्मयाचे ई-ग्रंथालय सुरू करण्यात यावे.
किती ग्रंथ ई मध्ये उपलब्ध आहेत?

१२. संस्कृत किंवा इतर भाषा शिकण्यास उत्सुक असलेल्या मनोगतींसाठी तसे शिकवणी वर्ग सुरू करण्यात यावेत.
'मनोगत' च्या मूळ उद्देशास छेद देणारे वाटते. प्रशासक सहमत होती असे वाटत नाही.