संध्याकाळी कुठून अशी गंधझुळुक येत आहे?

अजूनही कोण तिथे माझ्यासाठी फुलत आहे?

माझ्या मनाला पोचणारा पूल कधीच कोसळला आहे

भोवताली  खोल खंदक एकांताने भरला आहे.

इथे मनाच्या बेटावर वृक्ष एकटा उरला आहे

तरीही त्याच्या पारावर दिवा कोणी ठेवला आहे?

नाण्यांचा नाद रुचणारे मला कवी म्हणून हिणवतात

तेव्हा फुलकोवळे हात कशाला जवळ घेऊ बघतात?

कुणाच्या जुन्या पत्रातून गंध अजून दरवळतो

मीही उत्तर लिहितो आणि...फाडून फेकून देतो.

जतिन.