अनुराधाताई खूप सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या. मलाही खूप आवड आहे रांगोळ्या काढायची. माझे माहेर पंढरपूरचे. माहेरी आईची रोज दारात सडा- रांगोळीची सवय होती. आम्ही बहिणीही काढायचो रांगोळ्या. दिवाळीत आम्ही शेणाचा सडा टाकायचो दारात आणि त्यावर सुबक रांगोळ्या. सकाळ- संध्याकाळ नवनव्या रांगोळ्या. आधी आईला मदत असायची. नंतर आम्ही शिकल्यावर आईऐवजी आम्हीच काढायचो. १० किलो लागायची दिवाळीत.
लग्नानंतर नाशिकला फ्लॅटसिस्टीममध्ये राहत होतो. तरी दारात रांगोळी मी काढत होते. आणि माझ्या चुलत-सासुबाई अतिशय सुरेख रांगोळ्या काढायच्या. माझे सासर कोकणातले, माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीत मी माहेरच्या सवयीप्रमाणे पहाटे ५ ला रांगोळी काढायला सुरुवात केली. त्याआधी माझी नणंद किंवा सासुबाई काढत नव्हत्या. तर एक बाई चालल्या होत्या पहाटे फिरायला, कोकणस्थ आजी होत्या, मला म्हणल्या, " घाटावरच्या का हो सूनबाई तुम्ही? " मी म्हटले "हो. " मग म्हणतात, " तरीच, आमच्या कोकणातल्या पोरींना नाही हो जमत रांगोळी हातात धरायला!!"