एका ऑबसेसिव कंपल्सिव डिसऑर्डरचा कधीही उल्लेख होत नाही! किंबहुना ती इतकी लोकप्रिय आणि सर्वमान्य डिसऑर्डर आहे की ती डिसऑर्डर आहे असं म्हणणं म्हणजे स्वतःत काही तरी डिसऑर्डर निर्माण झाली आहे असं वाटायला लागू शकतं! ज्यांना पैसे मिळवण्याची संधी नसते ते काही तरी वेगळं जमा करतात आणि ज्यांना अशी संधी आहे ते पैसे जमा करतात इतकाच काय तो फरक आहे.

एक वेळ जागा आणि खर्च यामुळे वस्तुसंचयावर काही निर्बंध तरी येऊ शकतात पण पैसा इतका पूजानीय आहे की तो जमा करण्यावर काहीही निर्बंध येऊ शकत नाहीत. हा छंद माणूस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जोपासू शकतो आणि त्याला बाकी काहीही जमलं नाही आणि एवढी एकच गोष्ट जमली तरी त्याचं तो पार गेल्यावरही कौतुक होत रहातं!  

संजय