आनंदाच्या झाडाची कितीही फुले तोड़ता आली तरी 'आणखी हवे' चा पुकारा मन काही थांबवत नाही.

१०० % सहमत.

स्वर्गातली मैफल आता बहरली असेल.

कालच्या लोकसत्तामध्ये पुलंनी घेतलेली भीमसेन जोशींची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

त्यात पुण्यातल्या पुलंच्या घरी झालेल्या बैठकीचं हे वर्णन -

पु. ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?
भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?
पु. ल. : पुण्याला.
भीमसेन : अरे तुमच्याच घरामध्ये बसलो होतो. तुम्ही, ते गोडबोले होते.
पु. ल. : हो आठवतंय मला. या क्षणापर्यंत तो एक योगायोग वाटतोय. तुम्ही मियामल्हार सुरू केला आणि सुरू केल्याबरोबरच अगदी दोनतीन मिनिटांत बाहेर धो धो पाऊस पडायला लागला. तानसेनची कथा ही खरी आहे, असं म्हणावं, असं झालं. पहाटे चारवाजेपर्यंत गाणं चाललं होते. वसंतराव देशपांडे होते. मी त्या वेळी पेटी वाजवत होतो, असं मला आठवतंय.