हल्ली आपल्याला काय करायचे आहे? ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असते त्याचेच हे फळ आहे. सदर प्रकार म्हणे भर रस्त्यात घडला! आजू बाजुचे लोक काय गंमत बघत उभे होते काय?? कुणिच कसे मध्ये आले नाही?? आरोपी पण नावा गावा निशी सगळ्यांना माहित आहे म्हणे. झटपट निकाल लावून असल्या केसेस सोडवून अपराध्याला शिक्षा दिली तर जरब बसेल. अन्यथा चकमक घडवून त्यांना 'उडवणे' ह उत्तम उपाय!!!

असेच प्रकार जेव्हा एकतर्फी प्रेमातून मुलिच्या अंगावर ऍसिड टाकणे बाबतीत घडतात तेव्हा हात शिवशिवतात... असे कधी घडावे ही ईच्छा नाही.. पण जर का माझ्या समोर असे काही घडले तर मी जिवाची पर्वा न करता मध्ये पडेन...

अश्याच प्रसंगी रस्त्यातल्या मुलिंची छेड काढली जात असताना मी आजवर दोन वेळा मध्ये पडलेलो आहे! खरे तर एक जण पुढे झाला तर बाकिचे लोक पण मदत करतात.. मला अशी मदत मिळाली आहे..

हा वसा घेणारे हवेत.. तरच जगणे सुसह्य होईल अन्यथा जगणे कठीण आहे....