गीत
वणव्यात पेटले रान/ धुंद बेभान/
उसळती ज्वाला,
हृदयात तसे हे गान/ मुक्तशी तान/
भिडे गगनाला.
मनडोह जरी हा खोल/ उठे कल्लोळ/
गीत स्फुरताना,
घुमताच मनी हे बोल/ जातसे तोल/
ताल धरताना.
मदमत्त नदीची लाट/ मोडता घाट/
प्रलयसा होतो,
उमळून तसे ये गीत/ आणि शब्दांत/
दिनमणी गातो.
-जतिन.