फार वर्षांपूर्वी नामदेवाचे कुठल्या तरी उत्तर भारतीय भाषेत काही अभंग वाचल्याचं आठवतं. त्या सर्वांचा शेवटचा चरण होता, "जत जाऊ तत बिठलू भईला". त्या सर्वांचा भावार्थ असा होता की "मी जे जे विठोबाच्या पूजेसाठी आणले त्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद विठोबानी कुठल्या ना कुठल्या तरी जीवजंतूच्या रुपानी आगोदरच घेतला आहे". त्यात "आणीले दूध", "आणीले फूल" असे मराठी शब्द आहेत.