अंजू, संजय, मनीषा, स्वाती तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. लेख आवडल्याचे वाचून खूप आनंद झाला.
संजय, पटणार नाही असे का म्हणताय? खरे तर भूक ( शरीराची - पोटाची व लैंगिक ) व पैशाचा हव्यास जास्त भयावहच आहेत. किंबहुना, वस्तू, कपडे, यांसारख्या तत्सम ( काही प्रमाणात नजर अंदाज करण्यासारख्या ) संचयापेक्षा कितीतरी पटीने जास्त सखोल ( घातक ) परिणाम करणारे व फारच कमी प्रमाणात बरे होणारे आहेत. या लेखात हे दोन्ही मुद्दे व भावनिक गुंतवणुकीचा ( माणसांप्रती असलेली ) संदर्भ घेतला नाही. कारण केवळ ओझरता उल्लेख ( उगाच जाताजाता केलेला ) करून त्यातली प्रचंड व्याप्ती , अनेक बाजू मांडल्या जाणार नाहीत. खरे तर या तिनंही मुद्द्यांवर सविस्तर एक लेख लिहावयाचा आहे.
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.