'माझं काहीही नाही' म्हटलं की मग 'मी कुणीही नाही' या वास्तविकतेला तुम्ही पोहोचता, त्याला एंप्टीनेस, शून्यता म्हटलंय.
मला विचाराल तर जीवनातले सगळे प्रश्न 'जोडले जाणे' या एकाच प्रक्रियेशी निगडीत आहेत, एका अर्थानी आपण सर्वच ओसीडीनी ग्रस्त आहोत.
सायकियाट्री सामाजिक दृष्ट्या वेड्या माणसाला सामाजिक मान्यता असलेला वेडा बनवते, अध्यात्म माणसाला सूज्ञ बनवतं. तुम्ही विषय चांगला निवडला आहे पण तो अगदी मूलभूत आहे आणि त्याच्याकडे तसं बघीतलं तर मग आपणही ओसीडीनी बाधीत आहोत हे कळण्याची शक्यता निर्माण होते.
असो, हा एकदम बेसिक विषय आहे म्हणून लिहीलं. 'पैसा' आणि 'प्रेम' या लेखातून यावर लिहीलं आहेच.
संजय