साध्या मायक्रोवेव मध्ये जर केक करायचाच असेल तर साधारण ५ ते ७ मिनिटे लागतात, कमी जास्त वॅटेजप्रमाणे. परंतु त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरून सॉगी राहतो. (वाफ धरल्यामुळे)
मी स्वत: केक मायक्रोवेव मध्ये करणं प्रेफर करत नाही. मायक्रोवेव+कन्वेक्शन असेल तर गोष्ट निराळी..
मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरा. म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो, हे मी स्वतः करून पाहिले आहे.
शुभेच्छा!
स्वाती