अनु तुमचा प्रयत्न छानच जमला आहे. वाचतांना सर्व कथा अगदी नजरेसमोर घडत जाते.
होम्स च्या या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ही जगातील सर्वच वाचकांना आवडणारी अशी एक कथा आहे. १९२० च्या सुमारास एक 'होम्स कथा आणि वाचकांची आवड' असे सर्वेक्षण जगभर केले गेले. त्यात जगातील सर्व चाहत्यांना आवडणाऱ्या गोष्टीचा क्रम लावण्यास सांगण्यात आले. तेंव्हा ही कथा सर्वोच्च स्थानावर होती. त्या आवडीच्या कथा आणि त्याच बरोबर सर कॉनन डॉयल साहेबांच्या आवडीच्या कथेचा क्रम अशी तुलना केली गेली. सर कॉनन डॉयल साहेबांची ही दोन क्रमांकाची आवडती कथा होती. ( पहिला क्र. सिल्व्हर ब्लेझ ही होती.).
त्यामुळे ही कथा सदैव आवडणारी कथा अशीच समजली जाते. शंभर वर्षांनंतरही या क्रमवारीत काही बदल झाला असेल असे मला वाटत नाही.
यातील दोन गोष्ट मला आवडतात.
१. हेलन चे चातुर्य. आपण एका अज्ञात अश्या संकटात आहे असे हेलनला समजताच ती होम्सचे व्यावसायीक सहकार्य घेते. ही हेलनचे निर्णयक्षमता मला फार आवडते. तेंव्हा हेलन होम्सला सांगते कदाचित, तुमचे शुल्क मी चुकवु शकणार नाही. होम्स ताडकन उत्तरतो, ' माझे काम हेच माझे शुल्क आहे, तुम्हाला जमेल तेंव्हा तुम्ही ते चुकवु शकता. माझ्या व्यावसायिक शुल्काचा विचार न करता तुम्ही तुमची समस्या सांगा '.
२. होम्सने हेलनकडून सर्व कथा ऐकत असतांना नेमके काय घडणार आहे आणि त्यामागील हेलनच्या सावत्र वडलांचा हेतू लक्षात घेतो. हेलनच्या लग्नानंतर काही संपत्ती ही हेलनला जाणार असते. ते तिच्या सावत्र वडलांना सहन होत नाही. याचा अचूक अंदाज घेण्यात आलेले होम्सचे यश. त्याच बरोबर वैद्यकिय ज्ञान आणि गुन्हेगारी मन नेमके काय करणार आहे याचा घेतलेला आडाखा.
हेलनच्या व्यक्तीमत्वाने आपोआपच भारले जावे अशी ही कथा आहे. यात प्रथम वाचतांना मी अक्षरशाः जीव मुठीत धरून वाचत होतो हे लिहले तर यातील उत्कंठा मनोगतीच्या लक्षात येवू शकेल.
द्वारकानाथ