१. चित्तोपंत म्हणतात तसे 'सुविचार' नांवाचे वेगळे सदर असायला हरकत नसावी - (जसे प्रभाकर म्हणतात तसे आचरणात आणायलाही हरकत नाहीच !) हे प्रकाशित सुविचार एका संग्रहीत जागी साठवता येईल अशी व्यवस्था हवी. प्रश्न आहे की 'सुविचार' पाठवण्यात चढाओढ लागेल तीला निरपेक्षपणे तोंड कसे द्यायचे - कारण 'हो' 'ना' करता करता प्रत्येकाने दोन जरी सुविचार पाठवले तर त्याचा पुढचा नंबर वर्षभरानंतर लागायचा.... त्यापेक्षा 'सुविचार' नांवाचे नवीन वेगळे सदर सुरू करून ते क्रमवार वाचण्याची सोय असली तर बहार येईल.

२. मनोगत चा वर्धापन दिन कधी आहे ? काही कार्यक्रम सादर होण्याची शक्यता आहे का ?

३. 'कथा' 'कविता' 'चर्चा' 'व्याकरण' 'साहित्य' असें वर्गवार विभाग सध्याच्या विभागांपेक्षा सोपे वाटतील का ह्याचा विचार व्हावा.

४. जुने लेख उत्खननात शोधण्या साठी खास व्यवस्था होऊ शकेल का ?

माधव कुळकर्णी.    

ता.क. - आजचा बदल आवडलेला आहे असें म्हणतो न म्हणतो तोच त्या बदलातच बदल झाला ! आता चर्चा पुढे सुरू ठेवूया.