आपल्याला खरं तर काहिच करायचं नाही. मोठ मोठ्या चर्चा, कला क्रिडा याना प्रोत्साहन वगैरे देऊन शिकलेल्या माणसाना काम न देणं, हेच कसं बरोबर हे दाखवून द्यायचं आहे. मला तर वाटतं देशाचं अर्थकारण नक्की काय आहे हे राजकारणी लोकांनाही माहित नसावं. किंवा माहित असलं तरी त्याचा वैयक्तिक फायदा कसा करून घ्यावा हे पक्कं माहित आहे. म्हणूनच चांगला शिकलेला माणूस देशाबाहेर जातोय. वर्गलढा पोसणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे. वर्गलढा हे एक साहित्यिकांसाठी लिहिण्याचं कुरण आहे आणि त्याची मर्यादा तेवढीच आहे. वर्गलढ्याचा त्रास फक्त "नाही रे " यांनाच होतो, कारण पैशाचा उपयोग करून "आहे रे " वाल्यांनी राजकारण आणि प्रशासन विकत घेतलेलं आहे. म्हणून असे लेख लिहून फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. असो. पु̮ ̮. ले. शु.