मला आलेला ई मेल आवडला म्हणून येथे देत आहे.
ट्रक किंवा रिक्शाच्या मागील साहीत्य हे कधी हसवणारे असते कधी विचार करायला लावणारे.
१. बघतोस काय? मुजरा कर !....
२. बघतोस काय रागाने ओवरटेक केलय वाघाने !
३. "हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात"
४. सासरेबुवांची कृपा !
५. "बघ माझी आठवण येते का..."
६. "पाहतेस काय प्रेमात पडशील..."
७. अं हं घाई करायची नाही. तुमच्या हॉर्न ने सिगनल बदलत नाही.
८. अहो ईकडे पण बघा ना.....
९. तुमचे लक्ष अमच्याकडे का? ....
१०. लायनीत घे ना भौ !
११. थांब लक्षुमी कुंकू लावते!
१२. नाद खुळा.
१३. ... "१३ १३ १३ सुरुर..."
१४. पहा पन प्रेमाणे.....
१५. योग्य अंतर ठेवा. वाहनांमध्ये आणि मुलांमध्ये....
१६. अच्छा टाटा फीर मिलेंगे...
१७. "भिऊ नकोस मी तुझ्या पुढे आहे..."
१८. एका ट्रक च्या मागे लिहिले होते.
"राजू चिंटू सोनू" ....... आणि खाली लिहिले होते...
"बैंक ऑफ महाराष्ट्र च्या सौजन्याने"...
१९. "माज्याशी पैज लाऊ नका लय भारी पडेल"... आणी खाली बारीक अक्षरात लिहिले होते..
"ड्रायवर शिकत आहे..."
२०. हे ईश्वरा सर्वांचे भले कर. पण सुरुवात माझ्यापासून कर...