प्रस्तुत चर्चेच्या निमित्ताने एक कल्पना सुचली, म्हणून विषयांतराचा दोष पत्करुन इथेच मांडतो.

दर आठवड्यास ठराविक दिवशी ' काव्यपुर्ती ' ( किंवा तत्सम ) नावाने एखादी द्विपदी / काव्यपंक्ति घेऊन कल्पनाविस्तार

किंवा अन्य प्रकारे गीत / कविता / गझल / हझल / मुक्तक इ. ची रचना करण्याचे मनोगतींना आवाहन/ आमंत्रण करावे.

दर आठवड्याचा धागा वेगळा ठेवून,प्रांजळ अभिप्राय/ मार्गदर्शन ह्यांची देवाण-घेवाण होण्याकरता अनौपचारिक कार्यशाळेचे रूप

ठेवण्याचा प्रयत्न करता येईल असे वाटते. यथावकाश जो काही आकृतिबंध बनेल, त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे माफक प्रमाणात

नियमावलीही सर्वसहमतीने ठरवता येईल.

आपली मते कळ्ल्यास बरे होईल, कळावे.