आत्मा म्हणजे आपण, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो असं आपल्याला वाटतं तेव्हा वास्तविक शरीर एका ठिकाणाहून दुसरीकडे गेलेलं असतं, आपण नाही.  शरीराशी असलेल्या आपल्या सघन तादात्म्यामुळे आपल्याला तसा भास होतो.

चित्रगुप्त, त्याची न्यायसभा, पापपुण्याचा लेखाजोखा या सगळ्या माणसानी केलेल्या कल्पना आहेत. इथे अगणित जीव आहेत, असा जर हिशेब ठेवायचा झाला तर तो डेटाबेस केवढा होईल आणि प्रत्येकाच्या निवाड्याला अकल्पनीय वेळ लागेल. एकेकाचा नुसता नंबर लागायचा म्हटलं तर लाखो वर्ष लागतील.

आपल्या प्रत्येकाचा हिशेब प्रत्येकाच्या फक्त मेंदूत असतो. मृत्यूत मेंदूच्या पेशी डिसइंटीग्रेट झाल्या की पूर्ण हार्ड डिस्क फॉरमॅट होते. प्रत्येक नव्या जन्मा बरोबर नवी कोरी हार्ड डिस्क आपल्याला उपलब्ध होते.

एखाद्याला गत जन्मीची स्मृती येते म्हणजे नवजात अभ्रकाच्या मेंदूत काही  अनफॉरमॅटेड डेटा येतो (तो त्याच्या स्वतःच्याच पूर्व जन्मीचा असेल असं नाही). जेव्हा संवेदनेचा कर्सर अशा डेटाबेस पाशी पोहोचतो तेव्हा ती स्मृती सक्रिय होते आणि व्यक्तीला आपल्याला गतजन्मीची स्मृती उपलब्ध झाली असं वाटतं!

संजय