एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
वडिल गोरेगावी नोकरीस असताना सगळ्या भावंडानी वडिलाकडे जाण्याचा बेत रचला. पत्र लिहुन वडलाना येण्याची तारिख कळविली. अन ठरल्याप्रमाणे सगळी भावंड आगगाडीने पाडळी ते मसुर पर्यंत आली. पण वडिलाना पत्र मिळालेच नव्हते. आपल्या भारतातील पोस्ट खात्याच्या आपले दिव्य गुणांमुळे पोरांवर भयानक संकट ओढावलं. आगगाडी रात्री पोहचली होती. स्टेशनवरील सगळे प्रवासी हळू हळू नाहीसे झाले. हि भावंड मात्र वडिल कुठे दिसतात का म्हणुन केविलवान्या नजरेनी शोधशोध करत होती. बघता बघता स्टेशनवर चिटपाखरु उरलं नव्हतं. आता मात्र सपकाळ भावंडाची ...