पेठकर,
कथेबद्दल वरती सर्वांनी आधीच अभिप्राय दिले आहेत, तेव्हा आम्हाला विशेष काय जाणवले तेवढेच लिहितो-
- तीन भागात मांडलेली ही कथा इतकी चित्रदर्शी आहे की ती वाचताना तीन अंकी नाटकच पाहतो आहोत असे वाटले.
- पहिल्या दोन भागांत उल्लेखांत आलेले श्री० नाडकर्णी तिसऱ्या भागात मंचावर उपस्थिती लावून जातात ही गोष्ट विशेष दखल घेण्यासारखी आहे.
- कथानकाने सातत्याने वेग राखला आहे ह्याबद्दल आपले अभिनंदन.
- ह्या तीन भागांत कोठेही थोडेसे देखील विषयांतर होत नाही त्यामुळे कथेत पांचटपणा अजिबात आला नाही हेही विशेष.
आपली सिद्धहस्त लेखणी आणि आपल्यात दडलेला नाटककार अशीच उत्कट कथानके/नाटके प्रसवत राहो हीच सदिच्छा.
आपला
(नाट्यकथाप्रेमी) प्रवासी