आध्यात्मावर लेखन म्हणजे स्वतः शी गुणगुणलेलं गाणं आहे. जसा एखादा गायक किंवा त्याची गायकी आपल्याला आवडते तसं एखाद्याचं गाणं कुणाला आवडतं, कुणाला नाही. गाणारा स्वतःला व्यक्त करत असतो, एखाद्यानी दाद दिली तर तो त्याच्या अनुरोधानी गातो पण दाद मिळाली नाही तर तो गाणं थांबवत नाही कारण ती त्याच्या आनंदाची अभिव्यक्ती असते.
ज्यांना गाणं आवडत नाही त्यांच्या धारणा वेगळ्या असतात आणि त्या गायकाच्या अभिव्यक्तीशी जुळत नाहीत, यात गाणाऱ्याचा किंवा एकणाऱ्याचा दोष नसतो. एखादे वेळी गाणं न आवडणाऱ्यानी पूर्व धारणा विसरून गाणं एकलं तर त्याला मजा येऊ शकते कारण ते गाणं सर्वांसाठी असतं, धारणा व्यक्तीगत असतात.
संजय