श्रीमदभगवदगीता आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र यांचे सम्यक अवलोकन करण्याचा संकल्प असलेला एक ब्लोग वाचण्यात आला. मनोगतच्या परिवारातील श्रीमहाराजांच्या भक्त मंडळींचे तसेच नाम साधकांचे सदर ब्लॉगकडे वेधण्यासाठी त्याचा गोषवारा देत आहे.
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत :
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वत: |
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो s र्जुन ||गीता अ. ४/९ ||
श्रीमहाराजांचे आचार, विचार, व्यवहार पाहिल्यावर, त्यांचे चरित्र, प्रवचने वाचल्यावर असे ध्यानात येते की श्रीमहाराजांचा जन्म आणि कर्म हे दिव्य अर्थात अलौकिक आहे.नामस्मरणात स्वत:चा विसर पडेल तो क्षण मुक्तीचा असेल.
श्रीमहाराजांचे अस्तित्व कोठे आहे हे सांगताना श्रीमहाराजांनी नामधारकाला जे आश्वासन दिले आहे त्यालाच ' चैतन्यस्पर्श ' संबोधण्यात आले आहे.
आज जवळपास शंभर वर्षांचा काळ लोटला तरी श्रीमहाराजांच्या ' चैतन्यस्पर्श ' चरित्राने, अमृतवाणीने अनेकांचे जीवन प्रफुल्लीत होत आहे. प्रसन्न व आनंदी होत आहे. समाधानी होत आहे.
हा ब्लॉग ज्यांना मुळातूनच पाहावयाचा असेल त्यांनी खालील साईटला भेट द्यावी.
chaitanyasparsh.blogspot.com
|| जय जय रघुवीर समर्थ ||