नमस्कार,

याी मुद्दयांचाही विचार व्हावा,
  1. या संकेत स्थळावर निर्माणकर्त्यांविषयीची माहिती (अबाऊट अस) नाही. यामागे काही विशेष कारण आहे का? ही साइट बनवण्यामागे घेतलेली मेहनत पाहता त्यांना योग्य तो सन्मान आणि उत्तेजन मिळायला हवे.
  2. तांत्रिक दृष्ट्या अतिशय उत्कृष्ट आहे. या साइट साठी वपरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देणारे एक पान असावे.
  3. शक्य असल्यास एक "टू डू लिस्ट" असावी. जेणेकरून तांत्रिक किंवा ईतर साहाय्य ("काँट्रिब्यूशन" ला योग्य पर्याय आठवत नाही ः)) मिळू शकेल आणि मनोगतींनाही सहभागी झाल्याचा आनंद मिळेल.
आत्तापुरते बस झाले, आणखी काही आठवले तर लिहिनच.

~शशांक