कधीतरी  भावनांचे  भाग्य  फळफळावे
मला  बरे वाटावे... तिला  बरे  वाटावे!

कधीतरी पांगळ्याचे पाय मी बनावे;
मला जरा जमावे... तुला जरा जमावे.

कधीतरी सागराची लाट मी असावे;
मला तिने भिजावे... तिने किनारी जावे.

कधीतरी साजणाची सोबती असावे;
मला तू रे जपावे... तिने तुला जपावे.

कधीतरी चांदण्याची रात मी असावे;
मनात मोहरावे... तुझ्यात मोहरावे.