कविता/गझल आवडली!
कोमलांगी कुसुम होते व्यापुनी माझ्या मना
पाकळ्यांच्या बंधनाचे स्वप्न होते पाहिले
हुंगण्या गंधास ज्याच्या जाहलो वेडापिसा
त्या फुलाने देवळाचे स्वप्न होते पाहिले
वाहिले सर्वस्व, देवा, मोगऱ्याने पाउली
संगमा देहातिताचे स्वप्न होते पाहिले
राहु दे पश्चात माझ्या ओळ एखादी तरी
शारदे, मी अक्षराचे स्वप्न होते पाहिले
हे शेर खासच! लाजवाब!
-नीलहंस.