तरीही रोज झोपण्यापूर्वी सर्व कामं संपलेली असतात!
वेळ हा भास आहे, त्यात न समजण्या सारखं काय आहे?
एकदा एखादी गोष्ट भास आहे समजल्यावर तिचा सर्व धसकाच कमी होतो की नाही?
बायको ही नवऱ्यानी केलेली कल्पना आहे हे कळलं की संसाराचं ओझंच दूर झालं, संन्यास कशाला हवा?
वेळ हा भास आहे कळलं की आपण जाणीवेशी संलग्न होतो, जाणीवेनं जगायला लागतो, जगणं सोपं आणि सहज होतं. वेळ नाहीये या बोधातून जगून तर पाहा. मी काही माझा सिद्धांत सांगत नाही, वस्तुस्थिती सांगतोय!
संजय