जीवशास्त्रीय परिभाषाकोश म्हणजे वैद्यकीय कोश नव्हे.  शासकीय कोशांच्या यादीत अजून वैद्यकीय कोश आलेला नाही.
नेहमीच्या वापरातील सोप्या वैद्यकीय शब्दांसाठी कोश आहेत.  मनोगतावरचा कोश त्यासाठी बरा आहे.  परंतु अवघड आणि गुंतागुंतीच्या शब्दांसाठी वैद्यकीय कोश अजून बनलेला नाही.  समजा असा कोश केलाच तर त्याचा सामान्य जनतेला काहीही उपयोग होणार नाही. त्यांतील शब्द, इंग्रजी पर्याय दिल्याखेरीज डॉक्टरांनाही समजणार नाहीत.
कोशातील शब्द एवढे सोपे हवेत की फारसे स्पष्टीकरण न करता त्यांचा अर्थ मराठीभाषकाला समजू शकेल. हे काम जरा अवघडच आहे.