दक्षिणी भारतातील चारही भाषांच्या लिप्यांत ऱ्हस्व-दीर्घ एकार आणि ऱ्हस्व-दीर्घ ओकार लिहिण्यासाठी स्वतंत्र स्वरचिन्हे आहेत.  मराठीत असली चिन्हे नसली तर तसले उच्चार आहेत.
केर( उच्चार केऽर्), परंतु केरात(उच्चार के्रात्), तसेच बोर(उच्चार बोऽर्) आणि बोराने(उच्चार बो्राने).  इतकेच काय पण आराम या शब्दाचा उच्चार आराऽम् असा होतो. म्हणजे  'रा'तल्या आकारापेक्षा 'आ'तल्या आकाराचा उच्चार आखूड आहे.
ही ऱ्हस्व-दीर्घ चिन्हे लिहिण्यासाठी मनोगतावर नसली तरी अन्य देवनागरी कळफलकांवर स्वतंत्र सोय असते. ती वापरून 'क'ची अठराखडी अशी होईल. : क का कॅ कॉ कि की कृ कॄ कॢ कॣ क+उलटी मात्रा, के कै का+उलटी मात्रा, को कौ कं कः .
इंग्रजीत तर, COT(कॉट्) आणि CAUGHT(कॉऽट्) यांत अनुक्रमे ऱ्हस्व-दीर्घ ऑ आहेत. सिंहली लिपीत असले ऱ्हस्व-दीर्घ ऍ-ऑ  लिहिण्यासाठी स्वतंत्र चिन्हे असल्याचे पूर्वी वाचले होते.