मेजर मोल्सवर्थने अर्धवट सोडलेले मराठी-इंग्रजी आणि इंग्रजी-मराठी शब्दकोशांचे काम, इंग्लंडमधूनच हिदुस्तानी-मराठी शिकून आलेल्या कॅप्टन कॅन्‍डीने पूर्ण केले.  त्यामुळेच त्या कोशाला आत्ताआत्तापर्यंत कॅन्‍डीचा कोश म्हणत.  या कोशासाठी त्या‍ने इतकी मेहनत केली की तिची आठवण ठेवून कॅन्‍डीच्या निधनानंतर पुण्यातील ब्राम्हणांनी सुतक पाळले.